जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 जण दगावल्याची भीती
Borghat Old Pune-Mumbai Highway Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जातेय.
खोपोली: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 8 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदीराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही बस येत होती. सध्या बसमधील 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आणखी काही प्रवासी बसमध्ये अडकलेले आहेत. बचावपथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक असल्याची माहिती आहे. यामधील सात ते आठ जण दगावल्याची भीती व्यक्त होतेय. तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...

