Raigad Taliye Landslide | दरड कोसळली, तळीये गाव जमीनदोस्त, अनेकजण बेपत्ता

महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. यात आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झालाय.

गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI