रायगड समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र देवमासा, मच्छिमारांकडून जीवदान

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर देवमासा आढळला आहे. (Raigad Whales fish)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:24 PM, 1 Mar 2021

रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर देवमासा आढळला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव समुद्रकिनाऱ्यावर तब्बल दहा फूट लांबीचा देवमासा आढळला आहे. या देवमाश्याला मच्छिमारांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. (Raigad Whales fish found in Adgaon Beach)

श्रीवर्धन तालुक्यात आदगाव समुद्रकिनारी आज 1 मार्चला दुपारी 4 दरम्यान ही घटना घडली. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. जेमतेम 10 फूट लांबीचा देवमासा आहे. हा देवमासा भक्ष्यासाठी किवां जखमी अवस्थेमुळे समुद्रकिनारी आला असावा,  असा अदांज स्थानिकांना व्यक्त केला. या देवमासाला मच्छीमारांनी पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले आहे.