MNS : मराठी माणसासाठी पाय चाटू अन् वेळ आल्यास… राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल, बघा VIDEO
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या २०१७ सालच्या भाषणाची एक क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ही क्लिप संदीप देशपांडे यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा, मराठी माणसांना होणारी परप्रांतियांकडून मारहाण हा मुद्दा चांगलाच गाजतोय. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीर देशपांडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भाषणाची क्लिप सोशल मिडीयावर शेअर केली आहे. संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये 2017 मधील राज ठाकरे यांचं भाषण आहे. संदीप देशपांडे यांनी ही व्हिडीओ क्लिप शेअर करताना ‘मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायही छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दल ही घडवू….राजसाहेब ठाकरे यांचं फेब्रुवरी 2017 च्या भाषणातला अंश’, असे कॅप्शन दिले आहे.
मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पाय हीं छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दल ही घडवू. …राजसाहेब ठाकरे यांचं फेब्रुवरी 2017च्या भाषणातला अंश pic.twitter.com/cS2NNQ9chh
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 21, 2025
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!

