Saamana : मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व अन् हेच… अघोरी विद्येचे जनक म्हणत शिंदेंवर जहरी टीका
मिंधे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस गाडण्याची भाषा पुन्हा केली आहे. अधःपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे. असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवट्या यांना महत्त्व आले. हे मिंधे यांचे कर्तृत्व आहे. ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदेंवर घणाघात करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अघोरी विद्येचे जनक एकनाथ मिंधे, यांनी मुडद्यांसमोर भाषणं केली, मुडदेही रोजंदारीवर विकत आणलेले, असं म्हणत मिंधेंची मरण्या-मारण्याची भाषा म्हणजे त्यांच्या सध्याच्या मानसिक अवस्थेचे दर्शन आहे, असं म्हणत सामनातून जिव्हारी लागणारी टीका शिंदेंवर करण्यात आली आहे.
मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही. पक्ष चोरलेला, बाप चोरलेला, अमित शहांचे नेतृत्वदेखील भाड्याचे, राजकारणात आणलेला पैसाही चोरीचा. विचार असा नाहीच. त्यामुळे स्वतःच्या बेइमानीस प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अघोरी थयथयाट होणारच, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
