मॅच फिक्स झालीय, रिझल्ट ठरलाय! राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले असून, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये ही संख्या मोठी आहे. निवडणुकांचे निकाल आधीच ठरले असल्याचा दावा करत, त्यांनी ही लोकशाहीची आणि मतदारांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये तब्बल ९६ लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमध्ये लाखो खोटे मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, अशा परिस्थितीत निवडणुका घेण्याचा किंवा मतदारांनी मतदान करण्याचा उद्देश काय? कारण “मॅच फिक्स झालीय, निकाल आधीच ठरलाय” अशी परिस्थिती आहे.
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी पक्ष का चिडतो, असा सवालही त्यांनी केला. सत्ता कशी आली हे महाराष्ट्रातील सर्वांना माहिती आहे, असे नमूद करत त्यांनी सध्याच्या राजकारणावर टीका केली. विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षांनीही अशाच प्रकारची वक्तव्ये केल्याचे त्यांनी आठवण करून दिली.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच

