Raj Thackeray : कार्यकर्त्याच्या ‘त्या’ गाडीचं राज ठाकरेंना कौतुक; थेट शिवतीर्थवर..
Raj Thackeray News : राज ठाकरे आणि त्यांच्या एका कार्यकत्यातील भावनिक ऋणानुबंधाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अनेक कार्यकर्त्यांचं आपल्या नेत्यासाठी प्रेम असतं. आपल्या प्रत्येक सुख दु:खातसहभागी व्हावं अशी कार्यकर्त्याची इच्छा असते. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे हे कायम आपल्या कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होताना दिसून येत असतात. आज देखील ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर असाच एक कार्यकर्ता आणि नेत्याच्या नात्याचा भावनिक प्रसंग बघायला मिळाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याने एक नवी गाडी घेतली आहे. ही कार घेतल्यानंतर हा कार्यकर्ता थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर जाऊन पोहोचला. आपली नवी गाडी राज ठाकरेंना दाखवण्यासाठी हा कार्यकर्ता फार उत्सुक असलेला बघायला मिळाला. त्यावर राज ठाकरेंनी देखील त्याच्या या आनंदाला अधिक वाढवण्यासाठी कार्यकर्त्याच्या या गाडीचं स्वत: पूजन केलेलं बघायला मिळालं आहे. शिवतीर्थ बाहेर येत राज ठाकरेंनी स्वहस्ते कार्यकर्त्याच्या या कारची पूजा केली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधत विचारपूसही केलेली बघायला मिळाली.