राज ठाकरे यांनी सांगलीतील ज्या मशीदीच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला, तिथली ग्राऊंड रिअॅलिटी काय? पाहा…
राज ठाकरे यांच्याकडून सांगलीतील मशीदीच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणी नजीक मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी एका मशिदीच्या बांधकामावरून 26 फेब्रुवारी रोजी दोन गटांमध्ये मारामारीचे प्रकार घडला होता. पाहा व्हीडिओ...
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.त्यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. एक महिन्या पूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात एका गटाकडून तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला होता.त्यानंतर या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. सदरची मशीद ही बेकायदेशीर बांधण्यात येत असून कोणतेही परवानगी नाही. सदर ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको,अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

