AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेचं 'एकला चलो रे', पाहा लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले राज ठाकरे...

मनसेचं ‘एकला चलो रे’, पाहा लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले राज ठाकरे…

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Jul 14, 2023 | 2:43 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटना बांधणीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. राज ठाकरे आज दापोलीत आहेत. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटना बांधणीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. राज ठाकरे आज दापोलीत आहेत. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, “सध्या राजकारणात जे काही सुरू आहे. त्यामुळे कुणाबरोबर मी जाईल हे मला वाटत नाही. तसेच लोकसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक असते. या निवडणुकीत एकच भूमिका असते. एका जिल्ह्यासाठी एक आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसरी असं काही नसतं. तसेच येत्या 10 ते 15 दिवसात मी मेळावा घेणार आहे. यावेळी मी जे काय आहे ते स्पष्ट सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.”

Published on: Jul 14, 2023 02:43 PM
Follow Us