Ramdas Athawale | राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागून अयोध्येला जावे

रामदास आठवले आज नांदेडमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतर अयोध्येला दर्शनासाठी जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 21, 2022 | 9:07 PM

नांदेड: राज्यात हिंदुत्वाचा (Hindutva)मुद्दा उचलून धरणारे राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून खा. ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यावर आता राज्यात राजकारण सुरू झाले आहे. तोच मुद्दा धरत रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी मनसे नेते राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. तसेच ते म्हणाले राज ठाकरे (Ayodhya)यांनी अयोध्या दौरा रद्द केला त्यांचे स्वागत आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती. राज ठाकरे यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतर अयोध्येला दर्शनासाठी जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें