Abu Azmi | ‘Raj Thackeray यांनी धर्माचे राजकारण बंद करावे’ सपा नेते अबू आझमी यांची टीका-tv9
राज ठाकरे यांनी धर्मावरून राजकारण बंद करावे अशी टीका समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी धर्माचं (Dharma) राजकारण(Politics) बंद करावं असं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेवर अबू आझमी(Abu Azami) यांनी टीका केली आहे. अन्यथा देशाची परिस्थिती ही श्रीलंके सारखी होईल असं ही टीका करताना यावेळी अबू आझमी म्हणाले आहेत. हनुमान चालीसा मंदिराजवळ वाचा आम्ही पाणी नेऊन देऊ असं ही टीका करताना यावेळी अबू आझमी म्हणाले आहेत. राज ठाकरेचं राजकारण संपलेलं आहे. देशातील परिस्थिती अशा घटनांमुळे बिघडत आहे. नवीनात राणावर देखील अबू आझमी यांनी यावेळी टीका केली आहे. तुम्ही हनुमान चालीसा वाचा तुम्हाला कोणी रोखलं नाही आहे. पण, अशाप्रकारे जर तुम्ही वातावरण बिघडून हनुमान चालीसा वाचणार असाल तर ॲक्शनला रिॲक्शन नक्की होणार असं ही यावेळी अबू आझमी म्हणाले आहेत.
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्....

