Nashik News : ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’, ठाकरेंच्या सेनेची नाशकात बॅनरबाजी
Thackeray Brothers Unity : नाशिक शहरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबतचे बॅनर लावण्यात आलेले आहेत.
ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबत नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’ अशी बॅनरबाजी नाशिक शहरात करण्यात आलेली बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी हे बॅनर लावलेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबत चर्चा होता आहेत. त्यानंतर मुंबईत मनसेकडून देखील अशाच पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आलेली बघायला मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळा दराडे यांनी ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’ अशी साद उद्धव ठाकरेंना घातली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
