Raj Thackeray | मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार, आदेश देत म्हणाले…
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून हा नियम लागू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यावरून विविध राजकीय पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत सरनाईक यांना पत्र लिहून अंमलबजावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. चालकांच्या परिस्थितीचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून हा नियम लागू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यावरून विविध राजकीय पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत सरनाईक यांना पत्र लिहून अंमलबजावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. चालकांच्या परिस्थितीचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परिवहन विभागाच्या निर्णयावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मनसेने स्पष्ट केली आहे.
उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला मनसे विरोध करणार. मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार. संप करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. अशी राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या’ अशी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर पक्षाची भूमिका मांडली आहे. “तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.
दरम्यान, या मुद्द्यावरून वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 27, 2026 02:31 PM
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप

