कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरे यांची कोणावर टीका?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर आज राम मंदिर झालेच नसते, त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटलेच नसते. असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. त्याचसोबत महायुतीला पाठिंबा का दिला या प्रश्नाचं देखील राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, भूमिका बदलणं माझ्यासाठी आवश्यक होतं. पाच वर्षात राज्यातील परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राममंदीर उभं झालं नसतं. तसेच जम्मू काश्मीरमधील 370 कलम सारख्या गोष्टी घडल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा असं पक्षानं ठरवलंय असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

