Rajiv Satav Letter | राजीव सातव यांच्या ‘या’ चार ओळी, तुम्हालाही मार्ग दाखवतील
काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी एक फोटो आणि नोट शेअर केलीय. ती चिठ्ठी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे.
मुंबई: काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी एक फोटो आणि नोट शेअर केलीय. ती चिठ्ठी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. सत्यजित तांबे यांनी शेअर केलेली ही चिठ्ठी राजीव सातव यांनी स्वत: लिहिलेली आहे. ही चिठ्ठी २०१३ सालची आहे म्हणजेच जवळपास आठ एक वर्षे जुनी. काँग्रेसच्या एका शिबीरात सातव, तांबे, तौफिक मुलानी ही तरुण मंडळी एकत्र आलेली होती. त्यावेळेस राजीव सातव यांनी मुलाणींना एक चिठ्ठी लिहिलीय. त्या चिठ्ठीत जो मजकुर आहे तो प्रत्येकानं अंगीकारावा असाच आहे. एवढच नाही तर खुद्द राजीव सातव यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाराही आहे. राजीव सातव लिहितात- प्रिय तौफिक, प्रत्येक मनुष्यामध्ये एक शक्ती, ऊर्जा असते. त्या शक्तीचा उर्जेचा वापर आपण कसा करतो, त्यावर त्या माणसाचे भविष्य ठरते. आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचार कर.फार बाप माणूस होशील.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
