Vaishnavi Hagawane Case : सून मेली अन् फरार दीर, सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट, अलिशान गाड्या, मटणावर ताव अन्…
फरार असतानाही सुनेच्या मृत्यूचं सासरा आणि दिरांना काहीही देणं घेणं नसल्याचे पाहायला मिळाले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून हे स्पष्ट झालं आहे. फरार असताना आरोपी हगवणे पिता-पुत्र हॉटेलला मटणावर ताव मारत होते.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अटकेत असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पाच दिवस शिवाजी नगर कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस पाहायला मिळाला. फरार असताना हगवणे पिता-पुत्रांनी वैष्णवीच्या मृत्यूनंतर सात दिवस आलिशान गाड्यांनी प्रवास केला तर एका फार्महाऊसवर मुक्काम केल्याचे समोर आले.
फरार असताना हगवणे पिता-पुत्रानं काय केलं?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार असणाऱ्या हगवणे पिता पुत्रांचा राजेशाही थाट समोर आला आहे. सात दिवस फरार असताना हगवणेने अलिशान गाड्यांचा वापर केला. वेगवेगळ्या फार्म हाऊसवर मुक्काम केला. तर सून गेल्याचा कोणताच पश्चात्ताप चेहऱ्यावर न दिसता मटणावर ताव मारला. फरार असताना हगवणे पिता-पुत्रांची अलिशान पिकनीक एकदा बघाच