पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी समोरासमोर आले आणि….

राजू शेट्टी हे न्यायालयातून बाहेर पडताना सदाभाऊ खोत हे समोर आले, पण दोघांनीही एकमेकांकडे न पाहताच, काढता पाय घेतला.

  • Updated On - 5:53 pm, Tue, 2 February 21

बारामती : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे एकेकाळचे सख्खे मित्र आता एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचे अनेकवेळा दिसून आलं आहे. त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. दोघेही आज एका खटल्यासंदर्भात बारामती न्यायालयात हजर होते. राजू शेट्टी हे न्यायालयातून बाहेर पडताना सदाभाऊ खोत हे समोर आले, पण दोघांनीही एकमेकांकडे न पाहताच, काढता पाय घेतला. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट झालीच नाही.