Rakhi Sawant Video : बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनला सायबर सेलचं समन्स, 27 तारखेला चौकशी, राखी सावंतला आदेश काय?
‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शो मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर सामाजिक स्तरापासून ते राजकीय नेत्यांमध्ये एकच संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. अशातच ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ हा शो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शो मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर सामाजिक स्तरापासून ते राजकीय नेत्यांमध्ये एकच संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आई-वडिलांसंदर्भातील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत असताना आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला सायबर सेलने समन्स बाजावला आहे. त्यामुळे ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शो मधील वादग्रस्त विधान प्रकरणी राखी सावंतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावर सगळ्यांकडूनच विरोध केला जात असताना अभिनेत्री राखी सावंत हिने मात्र रणवीर अलाहाबादियाचं समर्थन केल्याचे पाहायला मिळाले होते. याप्रकरणी राखी सावंतला सायबर सेलने समन्स बाजावला असून येत्या 27 तारखेला चौकशीला हजर राहण्यासाठी आदेश या समन्सच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

