Ramdas Kadam: सेनेपासून दुरावलेल्या रामदास कदमांच्या शिवसेनेवर हल्लाबोल
खेडेकरांनी एका गावात बोद्ध वाडीच्या नावावर पूल बांधला. वास्तवात मात्र तेथे त्यांचीच इमारत असल्याचा दावा कदमांनी केला आहे.
शिवसेनेशी काडीमोड करीत शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदमांनी आता सेना नेत्यांवर हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे. खेडमधील नगराध्यक्षांच्या विरोधात पत्र लिहूनही गुन्हा दाखल का होत नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे. खेड येथील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर रामदास कदम यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. खेडेकरांनी एका गावात बोद्ध वाडीच्या नावावर पूल बांधला. वास्तवात मात्र तेथे त्यांचीच इमारत असल्याचा दावा कदमांनी केला आहे. या पुलाच्या बांधकामात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे.
Published on: Sep 02, 2022 12:38 PM
Latest Videos
