Ramdas Kadam : मातोश्रीतील ‘ते’ दोन दिवस, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे अन् पार्थिवावरून रामदास कदमांचं थेट चॅलेंज, म्हणाले…
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पार्थिव दोन दिवस मातोश्रीत का ठेवले, तसेच त्यांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले, यावरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. कदमांनी स्वतःची आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीये.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्री निवासस्थानी का ठेवण्यात आले होते आणि त्यांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले, असा सवाल कदमांनी केला आहे.
या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी स्वतःची आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. दसरा मेळाव्यात केलेल्या या आरोपांनंतर, कदमांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा छळ केल्याचा दावाही त्यांनी केला.
या आरोपांना नितेश राणे यांनी स्वित्झर्लंडहून कागदपत्रांसाठी कोण येणार होते, असा प्रश्न विचारून दुजोरा दिला. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हाताचे ठसे घेतल्याचे आपण स्वतः ऐकले असल्याचे म्हटले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान कदम यांनी दिले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

