Ramdas Kadam: ढसा ढसा रडले, रामदास कदम! म्हटले, “…तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार”
Ramdas Kadam: एवढं सगळं होऊन आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मुंबई : तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकता? असा सवाल शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. प्रश्न विचारताना रामदास कदम अक्षरशः ढसा ढसा रडलेत. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिली. हे सगळं ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधत असताना ते सांगत होते पण सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. एवढं सगळं होऊन आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Published on: Jul 19, 2022 11:27 AM
Latest Videos
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच

