उमेदवार पडल्यास आम्ही… रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंहांना विरोध कायम आणि भाजपला दिला इशारा
माढ्यात मोहितेंनंतर आता फलटणच्या निंबाळकरांनीही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना स्पष्टपणे विरोध केलाय. मेळावा घेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. जर भाजपनं उमेदवार बदलला नाही, तर पुन्हा शरद पवारांकडे जावं, अशी मागणी मेळाव्यातल्या जनतेने केली.
माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह यांना फलटणच्या रामराजे निंबाळकरांचा विरोध कायम आहे. मेळावा घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जर उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी भाजपला दिलाय. माढ्यात मोहितेंनंतर आता फलटणच्या निंबाळकरांनीही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना स्पष्टपणे विरोध केलाय. मेळावा घेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. जर भाजपनं उमेदवार बदलला नाही, तर पुन्हा शरद पवारांकडे जावं, अशी मागणी मेळाव्यातल्या लोकांनी केली. मात्र भावनिक न होता आपली मतं वरिष्ठांना सांगून येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ, असं रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय. शिवाय भाजपनं उमेदवार न बदलल्यास पराभवाला आपण जबाबदार नसू., असा इशाराही रामराजेंनी भाजपला दिलाय. एकीकडे माळशिरसच्या धैर्यशील मोहितेंनी प्रचार सुरु केलाय. त्यांचाही भाजपच्या रणजितसिंहांना विरोध असला तरी मोहितेंची पुढची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यात रामराजेंनी सुद्दा जर-तरच्या भाषेवरुन भाजपला इशारा दिला आहे.
Published on: Mar 22, 2024 10:58 AM
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
