राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !
संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. त्याला आता संजय राऊतांनीही लगेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे, असे उत्तर दिले आहे.
मुंबई : काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची (Narayan Rane) ताबडतोब पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी संजय राऊतांची (Sanjay Raut) कुंडलीच माडल्याचा दावा केला. संजय राऊत हे बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे बोलले आहेत. बाळासाहेबांनी इशारा केला असता तर संजय राऊत राहिलेही नसते. अशी घणाघाती टीका केली. तसेच संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. त्याला आता संजय राऊतांनीही लगेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. शिवसेनेचा प्रसार जोरात होत आहे. येत्या लोकसभेपर्यंत शिवसेनेचा एवढा विस्तार होईल की शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

