तुळजाभवानी मातेच्या चरणी रंगपंचमी, बघा कसा होता उत्साह
VIDEO | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी साजरी, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात रंगांची उधळण
तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी उत्सव आज साजरा करण्यात आला. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात रंगांची उधळण पुजारी आणि महंतांनी केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. आज सकाळी देवीला पांढऱ्या रंगाची साडी नेसवण्यात आली. त्यानंतर देवीची आरती झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवर विविध नैसर्गिक कोरडे रंग टाकून महंत, पुजारी, देवीभक्तांसोबत ही रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी देवीला विविध रंगानी बनविलेला गोड स्वादिष्ट भाताचा नैवद्य दाखवण्यात आला. आई राजा उदो उदो, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात रंगांची उधळण करण्यात आली. यावेळी देशात आलेल्या नवीन व्हायरसचे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी राज्यभरातील भाविक देखील या उत्सवासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

