Aurangabad | मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर Raosaheb Danve आणि Abdul Sattar यांची टोलेबाजी

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आच एकाच मंचावर होते, निमित्त होतं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जि.प. वास्तूच्या भूमिपूजनाचं.

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आच एकाच मंचावर होते, निमित्त होतं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जि.प. वास्तूच्या भूमिपूजनाचं… यावेळी दानवेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपल्या भाषणात मंचावरच्या पुढाऱ्यांना लगावले. तसंच सेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची दानवेंनी मुख्यमंत्र्यांसमोर फिरकी घेतली. अब्दुल सत्तारांना मतदान करु नका, असं दानवेंनी उपस्थितांना मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री आणि सत्तारही हसले.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात काय सांगितलं? असा सवाल त्यांना करण्यात आला. मुख्यमंत्री माझ्या कानात म्हणाले, तुम्ही मुंबईला येत नाही. या एकदा मुंबईला. बसू आपण. हे सगळं बाळासाहेब थोरात ऐकत होते. काँग्रेसवाले मला ताप द्यायला लागले तर मी भाजपवाल्यांना बोलावून घेत असतो. मग ते मला ताप कमी देतात, असं मुख्यमंत्री मला म्हणाले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, सध्या ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी कुणीही तुम्हाला कोणीही ताप देणार नाही. पण तुम्हाला जर काही अनुभव आला असेल तर आपण बसू, असं दानवे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI