Nana Patole: ‘अमजद खान’ नावाने फोन टॅप, रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार
Nana Patole: रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पुणे: रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणात (phone tapping case) आज पुणे पोलीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा जबाब नोंदवणार आहेत. अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही फोन खोट्या नावांनी टॅप केल्याचं उघड झालं आहे. याच प्रकरणात आता पुणे पोलीस आज नाना पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे पटोले काय साक्ष देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाना पटोले यांनी सर्वात प्रथम फोन टॅपिंगच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी त्यांनी विधानसभेत आवाजही उठवला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचाही जबाब नोंदवला होता. आज पटोले यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याने पटोले तपास अधिकाऱ्यांना कोणती माहिती देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 07, 2022 11:59 AM
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार

