Ratnagiri Gas Issue | रत्नागिरीत हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या वितरणावर निर्बंध लागू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने व्यावसायिक सिलेंडर वितरणाचे निकष ठरवले आहेत. आता हॉटेल व्यावसायिकांना फक्त एकच व्यावसायिक सिलेंडर दिला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील 30 मोठ्या हॉटेलांना आणि 10 छोटे हॉटेलांना सिलेंडर वितरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या वितरणावर निर्बंध लागू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने व्यावसायिक सिलेंडर वितरणाचे निकष ठरवले आहेत. आता हॉटेल व्यावसायिकांना फक्त एकच व्यावसायिक सिलेंडर दिला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील 30 मोठ्या हॉटेलांना आणि 10 छोटे हॉटेलांना सिलेंडर वितरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये मोठ्या हॉटेलांना 19 किलो आणि छोट्या हॉटेलांना 5 किलोचे सिलेंडर मिळणार आहेत. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा नीट न होणे हे अनेक छोट्या हॉटेलसाठी आव्हान ठरत आहे. चुलीवर जेवण बनवावे लागत असल्याने आणि फक्त एकच सिलेंडर मिळत असल्याने, पर्यटन हंगामात हॉटेल व्यवसायींना मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत गॅस एजन्सीने एक यादी तयार केली आहे ज्यात सिलेंडर मिळणाऱ्या तीस हॉटेलांचे नाव जाहीर केले गेले आहेत. या यादीत नसलेल्या हॉटेलांना सिलेंडर दिल्यास त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Published on: Mar 24, 2026 02:02 PM
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?

