AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?

मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?

| Updated on: Aug 29, 2026 | 5:28 PM
Share

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 हजारपेक्षा जास्त अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. नोकरी असूनही किंवा वार्षिक उत्पन्न अधिक असतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. पुरवठा विभागामार्फत मिशन सुधार या मोहिमेअंतर्गत रेशनकार्डची कसून तपासणी सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 हजारपेक्षा जास्त अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. नोकरी असूनही किंवा वार्षिक उत्पन्न अधिक असतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. पुरवठा विभागामार्फत मिशन सुधार या मोहिमेअंतर्गत रेशनकार्डची कसून तपासणी सुरू आहे. या मोहिमेदरम्यान, दहा निकषांच्या आधारावर शिधापत्रिकांची पडताळणी केली जात आहे.

यामध्ये 862 शिधापत्रिका धारकांचे वार्षिक उत्पन्न अधिक असल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय सेवेत असलेले तब्बल 16 हजार 693 लोक रेशन दुकानातून मोफत धान्य घेत असल्याचे समोर आले आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वास्तविक पात्र लाभार्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळावा, यासाठी पुरवठा विभाग ही विशेष मोहीम राबवत आहे. या कारवाईमुळे शासकीय योजनेचा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे.

Published on: Aug 29, 2026 05:27 PM

Follow Us