Video : 8 वा. उदय सामंतांना पाठिंबा, 10 वा. राजन साळवींची भेट! रत्नागिरीत नगरसेवकांचा 2 तासातच युटर्न
एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना समर्थन दिलेल्या नगरसेवकांनी अवघ्या काही तासांच युटर्न घेतलाय.
रत्नागिरी : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील दिग्गज आमदार आणि खासदारही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरोधात गेले. अनेकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं. हीच बाब नगरसेवकांच्या बाबतीतही दिसून येतेय. कोकणात मात्र शिवसैनिकांच्या मनात संभ्रम असल्याचं दिसून आलंय. एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना समर्थन दिलेल्या नगरसेवकांनी अवघ्या काही तासांच युटर्न घेतलाय. उदय सामंत यांची रत्नागिरीतील नगरसेवकांनी रात्री भेट घेतली रात्री आठ वाजता उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर हेच नगरसेवक दोन तासांनी राजन साळवींना भेटला. रात्री दहा वाजता उदय सामंतांना पाठिंबा दिलेले नगरसेवक राजन साळवींना भेटल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. एकूणच रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा (Ratnagiri Shiv Sena) गड वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

