अखेर तिढा सुटला, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर उदय सामंतांकडून मोठा निर्णय

महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून सातत्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर निवडणूक लढवण्याचा दावा केला जात होता. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण लोकसभा लढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

अखेर तिढा सुटला, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर उदय सामंतांकडून मोठा निर्णय
| Updated on: Apr 18, 2024 | 1:04 PM

गेल्या कित्येक दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा तिढा कायम होता. अशातच महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून सातत्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर निवडणूक लढवण्याचा दावा केला जात होता. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण लोकसभा लढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आज सरकारचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी त्यांचे बंधू आणि लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेले उमेदवार किरण सामंत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदय सामंत यांच्याकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. किरण सामंत माघार घेत असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केलं.

तर उदय सामंत यांनी हे जाहीर करताच दूसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून किरण सामंत यांनी माघार घेण्याच निर्णय जाहीर केल्यानंतर उदय सामंत यांनी भविष्यात किरण सामंत खासदार होणार असल्याचे म्हटले. आम्ही काही काळ थांबणार आहोत. भविष्यात किरण सामंतच खासदार असणार आहेत. आता आम्ही सर्व नारायण राणे यांच्या पाठिशी आहोत, असं सामंत म्हणाले.

Follow us
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.