Ratnagiri | मंदीकाळात एसटीला गणेशभक्तांनी तारले, रत्नागिरी आगाराला कोट्यवधींचं उत्पन्न

गणेशोत्सव काळ एसटीसाठी फायदेशीर ठरल्याचं समोर आलं आहे. मंदी काळात एसटीला गणेशभक्तांनी तारल्याचं चित्र रत्नागिरीत पहायला मिळतंय.

कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं एसटीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकल्याची प्रकरण समोर आली होती. एसटीला मंदीचे दिवस आले होते. मात्र, गणेशोत्सव काळ एसटीसाठी फायदेशीर ठरल्याचं समोर आलं आहे. मंदी काळात एसटीला गणेशभक्तांनी तारल्याचं चित्र रत्नागिरीत पहायला मिळतंय. गणेशोत्सवात परतीच्या प्रवासातून एसटीला 2 कोटी 71 लाखांचे उत्पन्न मिळालंय. चाकरमान्यांना घेवून 1029 गाड्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. जिल्ह्यातील 9 आगारातून परतीच्या प्रवासासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आलं होतं.

गणेशोत्सवासाठी 6 लाख चाकरमानी कोकणात

गणेशोत्सवासाठी 6 लाख चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. गणेशोत्सवाता परतीच्या प्रवासातून एसटीला कोट्यवधीचं उत्पन्न मिळाल्याची माहिती रत्नागिरी आगाराकडून देण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI