AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत

पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत

| Updated on: Jun 10, 2026 | 5:52 PM
Share

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली असून, जगबुडी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली असून, जगबुडी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना खेड आणि भोसते गावांच्या दरम्यान असलेल्या जगबुडी नदीच्या डोहात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेजण पोहण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र, पाण्याचा वेग आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोध आणि मदतकार्य सुरू करण्यात आले असून, मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्या, डोह आणि धोकादायक पाणवठ्यांमध्ये उतरताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या दुर्घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published on: Jun 10, 2026 05:49 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार