AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा

15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार… त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा

| Updated on: Jul 17, 2026 | 10:22 AM
Share

राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणात आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. याचदरम्यान आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबत मोठा दावा करत नवे राजकीय संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनात एनडीए सरकारकडून तीन महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत एनडीएने राजकीय हालचाली वाढवल्याची चर्चा सुरू आहे.

यावर भाष्य करत आमदार रवी राणा यांनी दावा केला की, येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. “सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीवर भूमिका सांभाळतील, तर राज्यातील जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल. केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळू शकते,” असा दावा त्यांनी केला.

याचबरोबर रवी राणा यांनी शिवसेनेबाबतही मोठे वक्तव्य केले. उद्धव ठाकरे यांनी भगवान राम आणि हनुमान चालीसाचा स्वीकार केल्याचा उल्लेख करत, “येत्या महिनाभरात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येऊ शकतात. राजकारणात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसतील,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या या दाव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दाव्यांबाबत संबंधित पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 17, 2026 10:22 AM

Follow Us