पुतण्या खळखळ कर्तुया…मग म्हातारं…, सदाभाऊ खोत यांचा खास शैलीत पवार काका-पुतण्यावर निशाणा
VIDEO | सदाभाऊ खोत यांची खास शैलीत पवार काका-पुतण्यावर खरमरीत टीका, बघा व्हिडीओ
सातारा : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार आणि शरद पवार यांचा राजकारणाचा फंडा राज्याला काही नवीन नाही. पुतण्याला वाटलं असावं की आपल्या हातात हे म्हतार काय कारभार देत न्हाई. म्हणून पुतण्या खळखळ कर्तुया. मग म्हातार…हातात घुंगराची काठी घेऊन वाजवत… वाजवत येतय…मग त्या काठीच्या घुंगराचा आवाज ऐकून बाकी (गडी )काही जण येतात म्हणत्यात… म्हाताऱ्याच सगळं ह्यो पुतण्या एकटाच हाणील …अस सगळं त्यांचं राजकारण चाललया… अस म्हणत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण बाजमध्ये पवार काका-पुतण्यावर टीका केली… त्यांच्या या टिकेनंतर त्याठिकाणी एकच हशा पिकला. राज्यातील शेतकरी ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या 22 मे ला कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि शरद पवार यांच्या भाजप बद्दलच्या मधल्या काळातल्या भिन्न- भिन्न दिसणाऱ्या भूमिकेविषयी पत्रकारांनी सदाभाऊंना विचारले असता सदभाऊनी आपल्या खास शैलीत काका- पुतण्यावर खरमरीत टीका करत उत्तर दिले
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी

