Ashish Shelar | अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये झालेल्या दंगलीत रझा अकादमीचा हात – आशिष शेलार
प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम ही सरकारची भूमिका आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. सरकारमधील एका मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीच्या फ्रंटमॅनसोबत कवडीमोल भावात व्यवहार केला. परिवहन मंत्र्यांने मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले.
प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम ही सरकारची भूमिका आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. सरकारमधील एका मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीच्या फ्रंटमॅनसोबत कवडीमोल भावात व्यवहार केला. परिवहन मंत्र्यांने मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले. इतर नऊ मंत्र्यांचेही असेच कारनामे आहेत. त्यांची उदाहरणे देतो. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन केले.
शेलार म्हणाले, परिवहन मंत्र्यांनी मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले. ते तोडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. मी अशा नऊ मंत्र्यांचे उदाहरण देतो. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील इथे बसलेल्यांना त्यांच्या ठिकाणच्या लोकांचे अवैध वाळू आणि अवैध दारुचे धंदे माहित आहेत. प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम अशी सरकारची भूमिका आहे, असा घणाघात त्यांनी केला. याकूबला फाशी देण्याची गरज नाही म्हणणारे अस्लम शेख या सरकारमध्ये मंत्री आहेत. दाऊदच्या बहिणीच्या फ्रंटमॅनसोबत एका मंत्र्याने कवडीमोल भावात व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

