वसई : सर्वांनीच येऊन माझ्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मी सर्वांशी बोललो आहे. ज्यांना ज्यांना मताची गरज आहे, त्या सर्वच वरिष्ठ नेत्यांशी माझे बोलणे झाले आहे. एकनाथ खडसे साहेबांबरोबर 1990 पासून संबंध आहेत, आज ते उमेदवार आहेत. येऊन बोलणे हा त्यांचा अधिकार आहे. मत मिळेल नाही मिळेल. उद्याच मत गुप्त आहे, त्यामुळे उद्याला काय होईल हे काही सांगू शकत नाही. पण अशा निवडणुकांमुळे आमचे वरिष्ठ नेत्यांशी बोलणे होते. त्यांना आमची काम सांगण्याची संधी मिळते, आम्ही त्यांना विनंती करू शकतो की आमच्या मतदार संघातील ही काम अडकलीत ती करून द्या. त्यामुळे अशा निवडणुकीची संधी वारंवार आली पाहिजे जेणे करून, सर्वांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.