‘रयत क्रांती संघटनेने बीआरएस पक्षासोबत युती करावी’, सदाभाऊ खोत यांना कुणाचा सल्ला
VIDEO | 'सदाभाऊ खोत यांनी बीआरएस पक्षासोबत जावं', कुणी केली मागणी
नांदेड : शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटनेने भारत राष्ट्र समिती पक्षा सोबत युती करावी अशी मागणी रयत क्रांती युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत केली.रयत क्रांती संघटना ही माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे.आणि भारत राष्ट्र समितीचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करीत आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात सदाभाऊ खोत यांनी देखील भारत राष्ट्र समिती सोबत युती करावी अशी मागणी रयत क्रांती युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे. पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्ष शिंदेंनी ही मागणी केल्याने सदाभाऊ बीआरएस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा निर्माण झालीय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

