MSRTC, Auto and Taxi Fare : ‘लालपरी’सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, प्रतिकिमी मागे किमान ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. परंतू इंधन आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा फटका चालकांना बसत आहेत. मात्र आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ झाली
आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण राज्यात एसटी बससह रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महाग होणार आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही. पण इंधन आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा फटका चालकांना बसत आहेत. मात्र आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात २४ जानेवारीपासून जवळपास १५ टक्क्यांनी एसटी प्रवास महागला आहे. अशातच आता एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवास देखील महाग होणार असल्याचे दिसतेय. तर दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रूपयांची वाढ लागू करण्यात येणार आहे. टॅक्सीचं किमान भाडं हे २८ रूपयांवरून ३१ रूपये होणार आहे तर रिक्षाचा प्रवासही तीन रुपयांनी महाग असून ऑटोरिक्षाचं किमान भाडं हे २३ रूपयांवरून २६ रूपये होणार आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

