Maharashtra Politics : ‘जय गुजरात’ वक्तव्यावरून वाद; मनसे कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल
Eknath Shinde Controvercial Statement : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ‘जय गुजरात’च्या घोषणेनंतर वाद निर्माण झाला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते, विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, मनसे कार्यकर्ता रोहन पवार याला शिंदेंच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर टीका करणे महागात पडले आहे. त्याच्याविरोधात कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पवार याने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत त्याला ‘जय गुजरात’ असे कॅप्शन दिले होते, जे आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत स्वप्निल एरंडे यांनी तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे रोहनविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

