'त्या' फाईलवर आर.आर. आबांची सही होती, भरसभेत दादांचे गंभीर आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला....

‘त्या’ फाईलवर आर.आर. आबांची सही होती, भरसभेत दादांचे गंभीर आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला….

| Updated on: Oct 29, 2024 | 6:10 PM

'आज आबांना जावून नऊ ते साडे नऊ वर्षे झालेली आहेत. अशापद्धतीची टीका आबा हयात असताना केली असती तर आबांनी त्यांना चांगलं उत्तर दिलं असतं. आबा गेले त्यावेळेला माझं वय साधारण 15 वर्षे होतं. मी आता त्या गोष्टीला उत्तर देऊ शकत नाही', असं रोहित पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर आर.आर. आबा पाटील यांच्यावर फोडलं आहे. सांगलीच्या तासगावमधील एका सभेत अजित पवार यांनी आर.आर. आबा पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत धक्कादायक विधान केल्याचे पाहायला मिळाले. “माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. फाईल तयार केली. अजित पवारांची ओपन चौकशी करण्याची सही आर. आर. पाटील यांनी केली. वाईट वाटले. आपलं काहीतर चुकलं असेल. पण आपल्याला कामाला लावून गेला. त्या फाईलवर आबांनी केलेली सहीबद्दल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला कोणी सही केली हे दाखवलं होतं”, असं अजित पवार म्हणाले तर या गंभीर आरोपांवर आर आर आबा पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गेली 9 वर्षे अजित दादांच्या नेतृत्वात काम केलं आहे. अगदी ताकदीचं काम केलं. असं असताना तासगावमध्ये अशाप्रकारच्या टीका आबांवर केल्या जात असतील तर कुटुंबीय म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा याचं दु:ख होतंय, असं रोहित पाटील म्हणाले.

Published on: Oct 29, 2024 06:09 PM