“शिंदेंची शिवसेना स्वत:ला प्रमोट करतेय”, जाहिरातीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया
राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये शिवसेनेच्या एका जाहिरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे.या जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
अहमदनगर : राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये शिवसेनेच्या एका जाहिरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. “शिंदे गटाची शिवसेना स्वतःला प्रमोट करत आहे, गेल्या दहा दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झाला आहे.तर काही नेत्यांना मंत्रिपदावरून काढावं, असा वाद सुरू झाला आहे.तर शिंदे गट मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे आणि भाजप महत्वाची नाही असं दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाला भाजपचे नाहीतर भाजपला शिंदे करायची गरज आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?

