“अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल, पण…”; पाहा काय म्हणाले रोहित पवार…
मुंबई, 28 जुलै 2023 | अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं. प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, […]
मुंबई, 28 जुलै 2023 | अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं. प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल, परंतु सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्री असते. परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना?”
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

