AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास एका मनाला आनंद तर दुसऱ्या मनाला तीव्र दु:ख; पाहा रोहित पवार काय म्हणाले…

Rohit Pawar on Ajit Pawar : ...तर पुढचे पाच वर्षे अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते; रोहित पवार नेमकं काय म्हणाले? पाहा...

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास एका मनाला आनंद तर दुसऱ्या मनाला तीव्र दु:ख; पाहा रोहित पवार काय म्हणाले...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 27, 2023 | 3:41 PM
Share

मुंबई | 27 जुलै 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली. महाविकास आघाडीत असणारे आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारच सत्तेत जाऊन बसल्याने राज्यात नेमकं विरोधी बाकावर कोण आणि सत्ताधारी पक्षात कोण असा सवाल विचारला जाऊ लागला. अशात आता अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेतेही तसा दावा करत आहेत. या सगळ्या घडामोडींवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल, परंतु सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही.

जरा अजित दादा महाविकास आघाडीमध्ये असते. तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्री राहिले असते, असंही रोहित पवार म्हणालेत.

सध्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राम शिंदे यांना काही अभ्यास नसतो आणि ते काही बोलत असतात. आमच्यावर आरोप करणं हे त्यांना सोपं वाटतं. ते स्वतः 5 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. मग त्यांना ही एमआयडीसी मंजूर करून घेणं का जमलं नाही, असं म्हणत भाजप नेते राम शिंदे यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कर्जतच्या एमआयडीसीच्या प्रश्नावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. केवळ रोहित पवार यांना या कामाचं श्रेय जाऊ नये म्हणून तुम्ही माझ्या मतदारसंघातील तरूणांच्या भवितव्याशी खेळत असाल तर ते योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.

उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत बैठक न घेतल्याने आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. कर्जत-जामखेडकमधील रोहित पवार समर्थकांकडून कर्जत-जामखेडमध्ये आज ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

कर्जत आणि जामखेड मध्ये 5 ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. एमआयडीसीच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार राम शिंदे आणि आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट