Sharad Pawar : युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री… बघा व्हिडीओ
यंदा अजित पवार विरूद्ध शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहे. त्यामुळे काका विरूद्ध पुतण्या अशी लढत विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीत पाहायला मिळणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय क्रांती पक्षाचा सर्वात मोठा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख आहे. तीन दशकांपासून या जागेवर पवार कुटुंबीयांचा ताबा आहे. 1984 साली शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली. यापूर्वी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा, त्यांची कन्या सुप्रिया सुळे 3 वेळा आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकदा खासदार झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंब आमने-सामने आले आहेत. यंदा अजित पवार विरूद्ध शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहे. त्यामुळे काका विरूद्ध पुतण्या अशी लढत विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीत पाहायला मिळणार आहे. अशातच आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने युगेंद्र पवार यांच्यासाठी घेण्यात आलेल्या एका सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले, बघा व्हिडीओ
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

