Mahadeo Jankar | आमचं सरकार होतं तेव्हाही एसटीचं विलीनीकरण कुठं झालं? – महादेव जानकर

रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावरील एक पर्याय असल्याचं महादेव जानकर म्हणाले.

बुलडाणा : एसटीचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर यांचे एकेकाळचे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं..? , रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावरील एक पर्याय असल्याचं महादेव जानकर म्हणाले. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI