Phaltan Doctor Death : रुपाली चाकणकरांचे महिला आयोगाचे अध्यक्षपद धोक्यात? पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजितदादांचं मोठं वक्तव्य
फलटण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबाला भेटण्याऐवजी आरोपीच्या घरी भेट दिल्याबद्दल पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे चाकणकर यांचे महिला आयोगाचे अध्यक्षपद धोक्यात असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद धोक्यात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फलटण येथील एका प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी घेतलेली भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांशी झालेल्या संवादात अजित पवार यांनी हे स्पष्ट केले. डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांशी फोनवरून बोलताना अजित पवार यांनी चाकणकर यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
“महिला आयोग महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यांनी सर्वप्रथम पीडित कुटुंबाला भेटायला हवे होते,” असे मत पवार यांनी व्यक्त केले. त्याऐवजी, आरोपीच्या घरी जाऊन निवेदन दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी या कृत्याचे समर्थन करणार नाही असे ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, या संदर्भात नक्की काय घडले आणि कुणी काय बोलले याबाबत अहवाल मागवून चौकशी केली जाईल. या घटनेमुळे रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

