देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, करुणा मुंडे यांची प्रतिक्रीया
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अटकेनंतर त्यांचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांची पाद्यपुजा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर काल चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. आज करुणा मुंडे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.
महिला अत्याचार प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांनी कधीच मदत केलेली नाही. देवकृपेनेच त्यांचा राजीनामा झाला अशी प्रतिक्रीया करुणा मुंडे यांनी दिली आहे. करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या पदाचे कोणतेही नियम पाळत नव्हत्या म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही आधीही केली होती असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. माझे पती धनंजय मुंडे ही नाशिकचे भोंदूबाबा अशोक खरात याच्या संपर्कात असू शकतात असाही आरोप काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी केला होता. आता त्यांनी रुपाली चाकणकर यांनी दिलेला राजीनामा योग्यच आहे. परंतू रुपाली चाकणकर त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हणत आहेत. यावर विचारले असता करुणा मुंडे यांनी करु दे कारवाई आम्ही तयार आहोत. मीच कोर्टाची नोटीस पाठलेली आहे असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 21, 2026 01:47 PM
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

