Video : सुप्रिया सुळेंची माफी मागा अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही- रूपाली पाटील 

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. याला चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केकेल्या टिकेची किनार आहे. “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते”, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. याशिवाय […]

आयेशा सय्यद

|

May 26, 2022 | 4:21 PM

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. याला चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केकेल्या टिकेची किनार आहे. “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते”, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. याशिवाय त्यांनी “बेताल ,सत्तापिपासू चंपा!”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळेंची माफी मागा अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, तुम्ही आम्हाला मारलं तर आम्ही गाल पुढे करणारे नाहीत तर हात तोडू, असं रुपाली पाटील यांनी म्हटंलय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें