AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia - Ukraine युध्दाला सुरुवात, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia – Ukraine युध्दाला सुरुवात, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 2:51 PM
Share

युद्ध जन्य परिस्थिती असताना आपले मित्र किंवा नातेवाईकांना युक्रेन मधून भारतामध्ये कसे आणावे? कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचे आहे आणि कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे आपली समस्या भारतीय एम्‍बेसी पर्यंत कशाप्रकारे पोहोचवायची?, चला तर मग जाणून घेऊया या काही प्रश्नांची उत्तरे..

Russia Ukraine Conflict: युद्ध जन्य परिस्थिती असताना आपले मित्र किंवा नातेवाईकांना युक्रेनमधून भारतामध्ये कसे आणावे? कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचे आहे आणि कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे आपली समस्या भारतीय एम्‍बेसी पर्यंत कशाप्रकारे पोहोचवायची?, चला तर मग जाणून घेऊया या काही प्रश्नांची उत्तरे… युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धजन्य (Russia Ukraine Conflict) परिस्थिती चालूच आहे तसेच यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रशियाने (Russia) सैनिकांची संख्या वाढलेली आहे तसेच रशिया युक्रेन च्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. यूक्रेनचे (Ukraine) विदेश मंत्री दिमित्रो कुलेबा यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही प्रत्येक शहर, गाव आणि एक एक इंच जमीनसाठी नेहमी लढत राहू,असा आमचा प्रयत्न राहील. हा प्रयत्न जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आमच्या विजय होत नाही तसेच रशियाची सेना यूक्रेनच्या दोन प्रांतांमध्ये म्हणजेच लुहांस्क-डोनेट्स्क येथे शिरली आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या दोन्ही भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ही घटना धोक्याची ठरली आहे. एअर इंडिया भारतीय लोकांना परत आणण्याच्या कामामध्ये लागलेली आहे. जर तुमचा कोणी नातेवाईक युक्रेनमध्ये आहे तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला यूक्रेन मधून भारतात परत आणू शकता.