Special Report | रशियाला कोणते परिणाम भोगावे लागतील? -Tv9

रशियाने युक्रेनवरील हल्ले तात्काळ थांबवावे असा इशारा आंतरराष्ट्रीय कोर्टाने रशियाला दिला होता. मात्र तरीही त्यांनी हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे त्याचे  रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 17, 2022 | 9:30 PM

मुंबई :  गेल्या काही आठवड्यांपासून भारताचे धोरण तयार करणा-या तज्ज्ञांचे रशिया-युक्रेन युद्धावर बारकाईने लक्ष आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, याचे आकलन सध्या सुरु आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी या समस्येवर तोडगा आणि चर्चेसाठी एकत्र बैठक करत आहेत. या युद्धात भारत प्रत्यक्ष सहभागी नसला तरी त्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि रणनितीवर परिणाम बघायला मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीचा विचार करता तो लागलीच जाणवायला लागणार आहे, कारण विषय खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. एवढेच नव्हे तर इंधनाचे दर ही गगनाला भडकण्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ले तात्काळ थांबवावे असा इशारा आंतरराष्ट्रीय कोर्टाने रशियाला दिला होता. मात्र तरीही त्यांनी हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे त्याचे  रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें